Samachar Live
आरोग्य

ताक पिण्याची योग्य वेळ तसेच फायदे जाणून घ्या

Taak

ताकाचे सेवन योग्य प्रमाणात केल्यावर शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला अतिशय जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात पाणीयुक्त घटक जास्त जाणे आवश्यक असते. यासाठी शरीराला गारवा मिळावा पाण्याचे प्रमाण प्रमाणशीर राहावे म्हणून वेगवेगळे शीतपेय घेतले जातात. अशा वेळेस सहजपणे उपलब्ध होणारा आणि अतिशय आरोग्यदायी पदार्थ किंवा शीतपेय म्हणजे ताक. ताक हे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ताकाचे अनेक फायदे आहेत. आपले शरीर ताजे तवाने राहण्यासाठी ताक आपली मदत करते. शरीरात तरतरी कायम राहते. उन्हाळ्यात ताक पिणे तर एकदम उत्तम आहे.

ताकाचे गुणकारी फायदे जाणून घेऊया:

१. वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.

२. मळमळणे, उलटी येणे अशी लक्षणे असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.

३. उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.

४.नियमीत ताकाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

५.उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केल्याने फायदा होतो.

६. सकाळ-संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.

७. वारंवार उचकी येत असल्यास ताका मध्ये एक चमचा सुंठ मिसळून सेवन केल्याने फायदा होतो.

८. जर आपण अती ताण असलेल्या स्थितीत असाल तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णताही कमी होते.

९. मळमळणे, उलटी येणे अशी लक्षणे असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.

१०. गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.

११. विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो.

१२. शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.

१३. विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम मिळतो. तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

१४. खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावावा. काही वेळाने स्नान करावे. खाजेपासून मुक्ती मिळेल.

१५. टाचा फाटल्यास ताक काढल्यानंतर निघणारं लोणी लावायला हवं.

१६. ताकामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात जे तुमच्या पचन नलिकेमधील नुकसानदायक बॅक्टेरियाला वाढण्यापासुन थांबवतात आणि यामुळे कँसरची भीती कमी असते.

Must Read

दैनंदिन जीवनात ह्या सवयी अंगी बाळगल्यास निरोगी राहाल

किरण परब

केळी खाण्याचे अज्ञात महत्वपूर्ण फायदे

किरण परब

नियमित योगा करण्यामुळे शरीराला होणारे अज्ञात फायदे

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More