Samachar Live
मनोरंजन

आशाताईंनी गायले रोमाँटिक गाणं

Asha Bhosale

भारतीय संगीतविश्वात वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरांची उधळण करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षीही आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आहे. शास्त्रीय, सुगम, लोकगीत, कॅब्रे असो वा सुफी, संगीतातील हरएक प्रकार आशाताईंनी आपल्या गायकीने सजवला. क्लब साँग गाण्यात आशाताईंना दुसरा पर्याय नव्हता आणि नाही. त्याकाळी चित्रपटसंगीतात नुरजहाँ, लतादीदी यांच्या सारख्या मातब्बर गायिकांचा बोलबाला असतानाही आशाताईंनी आवाजातील मदहोश नजाकतींनी स्वत:चे स्थान कायम ठेवलेले आहे. ते आजतागायत अढळ आहे. आशाताईंच्या गायकीतील हीच खासियत असलेली अदा संगीत रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. वयाची शहाऐंशी उलटलेली असतानाही आपल्या चिरतरूण मस्तीभऱ्या अंदाजाने आशाताईंनी ‘व्हॉट्सॲप लव्ह’ ह्या मराठी चित्रपटासाठी एक क्लब साँग गायले आहे.  

Must Read

सूरज पांचोलीचा ‘सॅटेलाइट शंकर’ चित्रपट ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

किरण परब

दगडू उर्फ प्रथमेश परब म्हणतो, ‘आपला हात जगन्नाथ’

किरण परब

सुबोध भावे आता तो झळकणार बॉलिवूडच्या ह्या अभिनेत्यासोबत

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More