Samachar Live
राजनीतिक

दोन आठवड्यात प्रगती अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी समितीला आदेश : अयोध्या प्रकरण

supreme court

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या जमीन वाद प्रकरणात मध्यस्थी समितीला दोन आठवड्यांत प्रगती अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. २५ जुलैपर्यंत प्रगती अहवाल द्या, अशी सूचना न्यायालयाकडून करण्यात आलेली आहे. न्यायालयानं जलद सुनावणी घ्यावी कारण अयोध्या जमीन वाद प्रकरणात मध्यस्थी समितीचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं, अशी मागणी हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणात स्थापन केलेल्या मध्यस्थांच्या समितीच्या कामात विशेष प्रगती नसल्याचा आक्षेप सिंह यांनी घेतला होता. त्यांच्या वतीनं वरिष्ठ वकील के. परासरन यांनी बाजू मांडली. मध्यस्थांच्या कामात कोणतीही प्रगती नसल्यानं न्यायालयानं या प्रकरणी सुनावणीची तारीख द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर मुस्लिम पक्षकारांच्या वतीनं डॉ. राजीव धवन यांनी प्रतिवाद केला. मध्यस्थांच्या समितीवर टीका करायची ही वेळ नाही, असं धवन म्हणाले. 

Must Read

काँग्रेसचा टोला, मोदींना शिवाजी महाराजांचे नावही नीटपणे घेता येत नाही

किरण परब

उद्धव ठाकरे – आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार

किरण परब

निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी. मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग?

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More