Samachar Live
मनोरंजन

बॉलिवूडमधील हा अभिनेता झळकणार बाबा या मराठी चित्रपटात, पाहा चित्रपटाचा टीझर

Baba

बॉलिवूडमध्ये अनेक वर्षं खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर संजू आता मराठी इंडस्ट्रीकडे वळला आहे. संजू बाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

बाबा या चित्रपटाच्या टीझरमध्ये वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आपल्या मुकबधीर मुलाला सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता याव यासाठी त्याचे वडील सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याला शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी तसेच लहान लहान गोष्टींमधील आनंद मिळवून देण्यासाठी ते झटत असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत आपल्याला दीपक डोबरियाल दिसणार असून त्याने याआधी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तो ओमकारा, तनू वेड्स मनू, दबंग 2, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, हिंदी मीडियम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातील त्याचे संवाद चांगलेच गाजले होते. या चित्रपटातील त्याच्या कॉमिक टायमिंगची देखील चर्चा झाली होती.

Must Read

महान व्यक्तिमत्त्व रोशन तनेजा अभिनयाचे गुरू यांचे निधन

किरण परब

बिग बॉस २ : महेश मांजरेकर गाणार मराठी रॅप साँग

किरण परब

२०१९ मधला ‘केसरी’ ठरला सर्वाधिक वेगाने १०० कोटींची कमाई करणारा चित्रपट

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More