Samachar Live
आरोग्य

किवी फळाचे अज्ञात स्वास्थ्यवर्धक फायदे

Kiwi 1

किवी हे फळ जास्त सर्वोकृष्ट नाही आहे पण या फळाचे बरेच काही अज्ञात फायदे आहेत. या फळात शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर मात्रेत असतात बाहेरून हे फळ भुया त्वचेचे आणि आतुन गडद हिरव्या रंगाचे असते ज्यात खाण्यायोग्य बिया देखील असतात. हे फळ आतुन चवीला गोड आणि खुप मऊ असतं परंतु या किवीची चव अन्य फळांपेक्षा खुप वेगळी असते. वेगळया चवीकरता सुध्दा हे फळ प्रसिध्द आहे. बऱ्याच देशांमध्ये याची शेती केली जाते, जसे इटली, न्युझीलेण्ड, चिली, ग्रीस आणि फ्रांस. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे.हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.

किवी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे:

आकर्षक चव

किवीचा चव आणि आकार दोन्ही वैशिष्टयपुर्ण आहेत. लहान मुले खुप आवडीने हे फळ खातात कारण इतर फळांपेक्षा किवी अगदीच वेगळे आहे. शरीराला संतुलीत पोषण मिळण्याकरता हे फळं आणि अन्न खाणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक खाद्यान्नात वेगवेगळे गुणधर्म आणि ताकद असते. आपला आहार निश्चित करतांना बऱ्याच लोकांसोबत ही समस्या असते की ते बऱ्याच कमी खाद्यान्नाला आपल्या आहारात समाविष्ट करतात त्यामुळे त्यांना पुरेसे पोषण तत्व मिळत नाहीत.

सुंदर त्वचा

नैसर्गिक रित्या किवी क्षारयुक्त आहे म्हणजेच हे खाण्याला आपल्याला थोडेसे आंबट देखील लागते. एक संतुलीत शरीर ते असते ज्यात PH चे चांगले संतुलन आहे यामुळे आपले शरीर सक्रीय, फ्रेशनेस ने पुर्ण आणि आपल्या त्वचेला तरूण ठेवण्यात मदत मिळते. असे म्हंटल्या जाते की किवीत असणारे व्हिटामीन C आणि E आपल्या शरीरात त्वचेच्या दुर्दशेपासुन आपल्याला वाचवतात. या समस्येपासुन वाचण्याकरता आणि आपल्या त्वचेला सुंदर ठेवण्याकरता किवीला आपल्या त्वचेवर लावावे.

विटामिन C चा उत्तम स्त्रोत

आपल्याला नेहमी हे सांगण्यात आलं की संत्र आणि लिंबु सर्वाधीक व्हिटामीन C देणारी फळं आहेत. परंतु हे कितपत खरं आहे पण किवी फळाचे परिक्षणाअंती हे समजले की प्रत्येक १०० ग्रॅम किवीत १५४ टक्के व्हिटामिन C चे प्रमाण आढळते जे लिंबु आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट आहे. व्हिटामिन C आपल्या शरीरात कॅंसर सारख्या भयावह रोगापासुन वाचवते तसेच व्हिटामीन ब् शरीराच्या रोग प्रतिकाराक क्षमतेला देखील वाढवण्यास साहायक आहे.

किवीमुळे पाचनक्रिया सुधारते –

किवी फायबर चा एक उत्तम स्त्रोत आहे. यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्येला कधी सामोरे जावे लागत नाही.

डायबिटीज असणा ऱ्यांकरता किवी गुणकारी आहे –

ग्लीसमिक च्या इंडेक्स मधे किवी सर्वात खालच्या स्थानावर आहे याचा अर्थ असा आहे की हे फळ तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढवत नाही. त्यामुळे आम्ही निश्चित रूपानं असं म्हणु शकतो की डायबिटीज असणारे देखील हे फळ खाऊ शकतात.

चांगली झोप

अभ्यासाअंती असे लक्षात आले की झोप न येण्याच्या समस्येवर किवी एक चांगला इलाज आहे. युवकांना आणि लहान मुलांना जर पुरेशी झोप येत नसेल तर किवी त्यावर एक उत्तम इलाज आहे. याच्या सेवनाने झोपेचा अवधी अगदी सहज वाढतो आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही गाढ झोप घेउ शकता.

Must Read

केळी खाण्याचे अज्ञात महत्वपूर्ण फायदे

किरण परब

पपई खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे !

किरण परब

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे हे आहेत फायदे

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More