Samachar Live
आरोग्य

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे हे आहेत फायदे

Watermelon

बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. आरोग्याची काळजी आपण घेतली नाही तर या वातावरणामध्ये त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसून येतात. कलिंगड म्हणजे उन्हाळाच्या ऋतूमधील खूप महत्वाचे फळ. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाण्याला अधिक पसंती असते. या फळाचा फायदा आपल्या शरीराला अतिशय जास्त प्रमाणात होतो कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्व तसेच विपुल प्रमाणात पाणी असते. कलिंगडामधून विटामिनस ए बी६ आणि विटामिनस सी खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्याचं प्रमाणे अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो असिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते. 

कलिंगडाचे फेस मास्क:

एक चमचा कलिंगडाच्या रसात एक चमचा साधे ग्रीक योगर्ट मिसळावे. हा मास्क चेहरा आणि मानेवर 10 मिनिटे लावून ठेवावा. दह्यातील लॅक्टिक एसिड आणि एन्झाईम्समुळे त्वचा एक्सफॉलिएट होते. तसेच त्वचेला मॉश्‍चरायझरचे फायदे मिळतात. 

एक चमचा कलिंगडाचा रस घेऊन त्यात अव्हाकॅडो पल्प मिसळावा. हा मास्क चेहर्‍यावर 20 मिनिटे ठेवावा. मग कोमट पाण्याने चेहरा धुवावा. अँटी एजिंगसाठी हा पॅक उत्तम ठरतो. 

कलिंगडाचा रस एका बाटलीत भरून ती फ्रीजमध्ये ठेवावी. थंड झाल्यावर कलिंगडाच्या रसात कापसाचा बोळा बुडवावा आणि तो चेहर्‍यावर लावावा. या नैसर्गिक टोनरमध्ये गुलाबपाणी आणि तुळसीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत. असे केल्याने चेहरा उजळतो. 

कलिंगडामध्ये पाण्याचा अंश अधिक असतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. काकडीमध्ये पाणी मुबलक असल्याप्रमाणेच ब्लिचिंग क्षमताही आढळते. यामुळे टॅन कमी करण्यास आणि त्वचेचा रंग़ हलका करण्यास मदत होते.

कलिंगडाचे आपल्या शरीराला होणारे फायदे :

 • कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्तचलन चांगल्या प्रकारे वाहू लागण्यास मदत होते.
 • शरीरातील कामोत्तेजक वाढण्यास कलिंगड मदत करते.
 • जर तुम्हाला डोळ्यांच्या तक्रारी असतील तर तुम्ही कलिंगडाचे सेवन करणे कारण या फळात व्हिटामिन ए असतं आणि व्हिटामिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. 
 • कलिंगड खाल्ल्याने डोकं शांत राहण्यास मदत होते आणि चिडचिडपणा कमी होते. 
 • वजन कमी करण्यासाठी कलिंगड हे फळ अतिशय फायदेशीर ठरत.
 • कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते.
 • उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करते.
 • कलिंगडमुळे अनेकदा लघुशंका होते. पण त्यामुळेच शरीरामध्ये तयार झालेली घाण शरीराबाहेर काढता येते.
 • हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी हे फळ रामबाण उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.   
 • कलिंगडाच्या बीयाही जास्त प्रमाणात उपयोगी ठरतात. या बियांची पावडर करुन ती चेह-यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच याचा लेप डोके दु:खीवर चांगला उपाय आहे. 
 • कलिंगडाचे नियमीत सेवन केल्यास पोटाचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो.
 • कलिंगड चेह-यावर तावल्यास चेहरा ताजातवाणा होतो आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात.
 • कलिंगडामध्ये अनेक पोषक घटक असून त्याच्या सेवनाने शरीराला फायदा होतो. यामध्ये व्हिटॅमीन ई, व्हिटॅमीन ए आणि पोटॅशियमचा भरपूर स्रोत असतो.
 • कलिंगडामध्ये ९२% टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी या फळाची मदत होते.
 • कलिंगडामध्ये व्हिटॅमीन ए आणि सीचं भरपूर प्रमाण असतं. या व्हिटॅमीनमुळे केस आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. 

Must Read

नियमित योगा करण्यामुळे शरीराला होणारे अज्ञात फायदे

किरण परब

ताक पिण्याची योग्य वेळ तसेच फायदे जाणून घ्या

किरण परब

उन्हाळ्यात आवळा विविध प्रकारे गुणकारक ठरू शकतो

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More