Samachar Live
जीवनशैली

त्वचेसाठी फायदेशीर ठरतो आंबा; पिंपल्स दूर करण्यासोबतच होतात अनेक फायदे

Mango 1

उन्हाळा येताच चाहूल लागते ती फळांच्या राजाच्या आगमनाची म्हणजेच आंबा… आंबा चवीष्ट असण्यासोबतच त्वेचासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आंबा त्वचा उजळवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. याव्यतिरिक्त प्रखर उन्हामुळे झालेल्या टॅनिंगच्या समस्येवर अत्यंत फायदेशीर ठरतो. आंब्यामध्ये आढळून येणारे न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत.

आंब्याचे फेस मास्क-

चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येचा प्रत्येकालाचउन्हाळ्यात खुप त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये पिंपल्सच्या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. त्यासाठी तुम्ही कैरीच पन्हं किंवा कैरीच्या ज्यूसचं सेवन करू शकता. कैरीचा ज्यूस एस्ट्रीजेंटच्या रूपामध्ये पिंपल्स हटवण्यासाठी मदत करतो. याव्यतिरिक्त सुरकुत्या दूर करण्यासाठीही मदत होते. पिंपल्सच्या समस्येपासून सटका करून घेण्यासाठी असा तयार करा आंब्याचे फेस मास्क…

फेस मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे आंब्याचा पल्प, एक चमचा मुलतानी माती आणि थोडसं गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. हा तयार फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. सुकल्यानंतर हे चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. मँगो फेस मास्कचा वापर केल्याने पिंपल्सपासून सुटका होते आणि त्यामुळे त्वचेच तारुण्य टिकून राहतं.

आंबा खाण्याचे इतर गुणकारी फायदे:

१. ब्लॅकहेडच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी आंब्याचा पल्प मिल्क पावडर आणि मध एकत्र तयार करून स्क्रब तयार करा. त्यानंतर हे चेहऱ्यावर लावा.

२. जर त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या असतील तर आंबा आणि मध एकत्र करून तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावा. आंबा आणि मधामध्ये त्वचा उजळवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक तत्व असतात. तुम्ही आंब्याचा गर मध आणि बदामाचं तेल एकत्र करून तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता.

३. मँगो मास्कचा वापर केल्यानंतर तुम्हाला फ्रेश लूक मिळण्यास मदत होते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी आंब्याचा पल्प ओट्स मध आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

Must Read

पुणे: शनिवार वाडा एक रहस्यमय कहाणी

किरण परब

महाबळेश्वर सारखी अजून काही थंड हवेची ठिकाणे

किरण परब

१२ धड़े आचार्य चाणक्य नीतीच्या जीवनशैलीवर आधारित

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More