Samachar Live
मनोरंजन

बिग बॉस २ : महेश मांजरेकर गाणार मराठी रॅप साँग

mahesh m

रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार रॅप सादर केल्यानंतर आता महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत नविन रॅप साँग. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी नुकतंच एक रॅप सॉंग शूट केले जे त्यांनी स्वतः गायले आहे. महेश मांजरेकर यांचा डॅपर लुक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप सॉंगमधली एन्ट्री एकदम कडक आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोज महेश मांजरेकरांनी शूट केले असून प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. महेश मांजरेकरांच्या या वेगवेगळ्या लुक्समुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणते सेलेब्रिटी जाणार याबद्दल प्रेक्षकांनी बरेच तर्क देखील लावण्यास सुरुवात केली आहे.

Must Read

‘तेरे नाम’ सुपरडुपर हिट चित्रपटाचा बनणार सीक्वल!

किरण परब

मराठी पॉप गाण्यांचे सूर आता घुमणार अमेरिकेत

किरण परब

महान व्यक्तिमत्त्व रोशन तनेजा अभिनयाचे गुरू यांचे निधन

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More