Samachar Live
राजनीतिक

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; बैठकीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता

Tripal t

नवी दिल्ली – आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधात नव्या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्यता असून सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मांडले जाणार आहे. 

एनडीए सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागच्या कालावधीत तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले होते. मात्र हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आलं परंतु राज्यसभेत विधेयक अजूनही प्रलंबित आहे. १६ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर तिहेरी तलाकचं विधेयक संपुष्टात आलं आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधातील विधेयक नव्याने मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. १७ जून पासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. १७ व्या लोकसभेचे हे पहिलं अधिवेशन असणार आहे.

Must Read

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : ‘सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख’

किरण परब

लोकसभा निवडणूक २०१९ : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला

किरण परब

निवडणूक जिंकताच सनी देओल झालेत ट्रोल! लोकांनी म्हटले, ‘गुरदासपूर भी आ जाओ’!!

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More