Samachar Live
सामाजिक

प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर सीबीआयचे छापे

Indira & Anand

नवी दिल्ली : विदेशी फंडिंग नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या दिल्ली आणि मुंबईतील घरावर गुरुवारी सीबीआयने छापे टाकले असून अद्याप सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्यावर लॉयर्स कलेक्टिव्ह’ या स्वयंसेवी संस्थेसाठी विदेशातून फंडिंग घेऊन निधी विनियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

इंदिरा जयसिंग २००९ ते २०१४ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होत्या. त्यावेळी स्वयंसेवी संस्थेसाठी विदेशी निधी गोळा करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयकडे इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्याविरोधात केस दाखल करण्यात आलेली होती. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्या या स्वयंसेवी संस्थेचा परवानाही रद्द केला गेला होता.

Must Read

पौडमधील वन क्षेत्रपाल कार्यालयात बॉम्बस्फोट

किरण परब

घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ, सामान्य माणसाला मोठा झटका

किरण परब

‘विराट’ संघाला पंतप्रधान मोदींनी सांगितला जीवनाचा मूलमंत्र

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More