Samachar Live
सामाजिक

खासगी नोकरी करता? मग पुढच्या महिन्यापासून वाढणार तुमचा पगार

Salary

मुंबई: खासगी नोकरी करणाऱ्यां कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे. सरकारनं कर्मचारी राज्य विमाच्या अंतर्गत कापण्यात येणाऱ्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ जुलै २०१९ पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून खासगी नोकरदारांचा पगार वाढेल. 

सरकारच्या निर्णयाचा १ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना फायदा होईल. कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) कायद्यानुसार आतापर्यंत खासगी नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून ६.५ टक्के इतकी रक्कम कापली जात होती. यातील १.७५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्याचा आणि ४.७५ टक्के हिस्सा कंपनीचा होता. मात्र यापुढे कर्मचाऱ्याच्या पगारातून ४ टक्के इतकीच रक्कम कापली जाईल. यातील ०.७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार १ टक्क्यानं वाढेल. याचा अर्थ २१ हजार पगार असलेल्यांच्या पगारात २१० रुपयांनी वाढ होईल.

Must Read

उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा

किरण परब

गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे कालवश

किरण परब

झारखंड बॉम्ब ब्लास्ट – निवडणूक काळात पेरलेला बाँम्ब आज फुटला; 11 जवान जखमी

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More