Samachar Live
सामाजिक

मान्सूनचं आगमन लांबणीवर, हवामान विभागाच्या अंदाजानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

monsoon

नवी दिल्ली: मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं दर्शवला आहे. हवामान विभागाआधी स्कायमेटनं काल मान्सूनच्या आगमनाचं भाकीत वर्तवलं. मान्सून ४ जूनला केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली.

मान्सूनच्या आगमनाला यंदा उशीर होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होईल. गेल्या वर्षी २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. २०१७ मध्ये ३० मे रोजी मान्सूननं केरळमध्ये वर्दी दिली होती. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये जवळपास आठवडाभर विलंबानं दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. ‘अल निनोचा प्रभाव कमी असेल आणि पावसाचा हंगाम सुरू होताच हा प्रभाव आणखी ओसरेल. यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

Must Read

200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द

किरण परब

श्रीलंकेच्या राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांची नविन घोषणा

किरण परब

मुंबईतील पादचारी पूल तुटण्याची दूसरी जीवनघाती दुर्घटना

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More