Samachar Live
कलासंस्कृती

चैत्र नवरात्री साजरी करण्यामागील महत्त्व

Navratri

चैत्र नवरात्रीमध्ये घरात पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. चारी नवरात्रीचे उद्देश्य विभिन्न आहेत. पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे. तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जात.

तसेच गुप्त नवरात्रीला तंत्र क्रियांशी जुळलेले लोकं अधिक पूजन करतात. या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्म-कर्म याने जुळलेले लोकं साधना करतात. या दरम्यान केलेले टोने-टोटके खुप प्रभावशाली असतात.चैत्र नवरात्री म्हणजे या नऊ दिवस लोकं उपवास ठेवून आपली भौतिक शारीरिक आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची कामना करतात. या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते.

चैत्र नवरात्रीत सूर्याचं ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेष मध्ये प्रवेश करतो. चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते. सूर्याच्या मेष राशीत प्रवेश करून इतर सर्व राशींवर प्रभाव टाकतं.

नवरात्रीत नऊ दिवस खूप शुभ आणि लाभदायक असल्याचे असे मानले जाते. या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुर्हूत न बघता देखील करता येतात. कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते.

हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होते. तिसर्‍या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती. नंतर चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील प्रकट झाले होते. म्हणून या दिवसांचे खूप जास्त महत्त्व आहे.चैत्र नवरात्रीत हवन पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत. या दरम्यान चारी नवरात्र ऋतूंच्या संधीकाळात असतात अर्थात या दरम्यान हवामान बदलते. या कारणामुळे व्यक्ती मानसिक रूपाने स्वत:ला कमजोर जाणवतो.

चैत्र नवरात्रीत व्रत करताना महत्त्वाचे नियम

नवरात्रीत दररोज दुर्गा देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फुलं अर्पित करावे.

नऊ दिवस लिंबू कापू नये, असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.

नऊ दिवस दुपारी झोपू नये. याने व्रताचे फळ मिळत नाही.

या दिवसात काळे कपडे परिधान करू नये.

कांदा-लसूण या व्यतिरिक्त धान्य आणि मीठ याचे सेवन देखील करू नये.

Must Read

महाराष्ट्र दिन – शिल्पकार महाराष्ट्र निर्मितिचे

किरण परब

होळी रंगाचा आणि उत्साहाचा सण

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More