Samachar Live
मनोरंजन

‘तुला पाहते रे’मध्ये राजनंदिनीसमोर येणार का विक्रांतचा खरा चेहरा

rajnanadni

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत सध्या एक वेगळेच वळण आले असून विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकताच प्रसारीत झालेल्या भागात विक्रांत राजनंदिनीवर वैतागतो. कारण राजनंदिनी सर्व प्रॉपर्टी आईसाहेब व जयदीपच्या नावावर करण्याचा विचार करते.

एकीकडे राजनंदिनीने सर्व प्रॉपर्टी आईसाहेब व जयदीपच्या नावावर केल्यामुळे विक्रांतच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून दुसरीकडे तर राजनंदिनी दादासाहेबांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे बेचैन झाली आहे. त्याचदरम्यान सरंजामे बंगल्यात जोगतीण राजनंदिनीला भेटण्यासाठी येते. ती राजनंदिनीला कुणावरही विश्वास ठेवू नकोस, अशी ताकीद देऊन जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांत सरंजामेंच्या वकीलाकडे जातो आणि प्रॉपर्टीबद्दल विचारू लागतो. तो वकीलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. पण वकील सांगतात की दादासाहेबांनी सांगितले होते कोणतेही प्रॉ़पर्टी कुठल्याही मार्गाने विक्रांतच्या नावावर करता येणार नाही, असा क्लॉज ठेवतात. 

त्यानंतर जालिंदरच राजनंदिनीला ती चिठ्ठी पाठवतो. यावेळी जालिंदर तिला विक्रांत फ्रॉड असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यानेच दादासाहेबांच्या हत्येचा कट रचला असल्याचा संशय असल्याचे सांगतो. पण राजनंदिनी विक्रांत असे करू शकत नाही, असे सांगून तिथून निघून जाते.

Must Read

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत येणार सिनेमात एकत्र

किरण परब

एंटरटेनमेंट, धम्माल-मस्तीचे भन्नाट पॅकेज म्हणजेच ‘रंपाट’!!

किरण परब

सुरु झाली ‘गदर’च्या सीक्वलची तयारी! लवकरच शूटिंगला सुरुवात

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More