Samachar Live
मूव्ही रीव्यूव्ह

मूव्ही रीव्यूव्ह – ‘सैराट’नंतर रिंकू राजगुरूचा ‘कागर’मध्येही दमदार अभिनय

Kagar

कागर या चित्रपटाची घोषणा झाल्यावरच या नावावरून आणि सैराट फेम रिंकू राजगुरूच्या दुसऱ्या मराठी चित्रपटामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती. नवीन कोवळी फुटलेली पालवी म्हणजे कागर. अनेक वर्षांपूर्वी हा शब्द खेडेगावात वापरला जायचा. याच शब्दाचा वापर करून खेडेगावातील राजकारणातून राज्याच्या राजकारणात प्रवास करणाऱ्या म्हणजेच नवीन कोवळी फुटलेल्या राणीचा उदय म्हणजे कागरचा प्रवास. हा प्रवास साधासुधा नसून प्रेम,खून,हिंसा,गटातटाचं राजकारण यांच्यात गुरफटलेल्या ग्रामीण राजकारणाचा पुरता बुरखा मांडण्याचा प्रयत्न म्हणजे कागर. या चित्रपटात रिंकू राजगुरु सह इतर कलाकार शुभंकर तावडे आणि शशांक शेंडे काम करताना वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते आणि विकास हांडे आहेत. तसेच ह्या चित्रपटाचे संचालन मकरंद माने यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेची ही ग्रामीण भागातील अतिशय साधी आणि सरळ कथा.. बुध्दिबळाच्या पटात राजाला सर्वोच्च स्थान असलं तरी पटातील वजीर हे अत्यंत हुशार आणि महत्वाचं प्यादं असतं हे या चित्रपटात दर्शवल आहे. अश्याच ग्रामीण भागातील एका गावातील आमदाराला शह देण्यासाठी गावातील गुरूजी (शशांक शेंडे) या नावाने चाणक्यनिती खेळणारे गावातील राजकारणात एक नवा पाट मांडतात. गावातील भैय्यासाहेब या तरूण नेतृत्वाला मदतीची रसद पुरवून आमदारासमोर ते एकप्रकारे आवाहन उभं करतात. या सगळ्यात गुरूजींची लेक राणी (रिंकू राजगुरू) आणि गुरूजींचा उजवा हात आणि इंजिनियरींगचे शिक्षण घेऊनही शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या युवराज (शुभंकर तावडे) यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलत असतो. गुरूजींच्या या चालीमुळे आमदारही भडकून उठतो आणि आपली कूटनिती सुरू करतो. या सगळ्या नात्यात एक दिवस गुरूजींच्या सांगण्यावरून युवराज असं काही करून जातो की पुढे गावातील राजकारणाला एक युटर्न मिळतो आणि राणी ग्रामीण राजकारणातील एक नवं नेतृत्व म्हणून लोकांसमोर येते. या नाट्यात पुढे युवराजचं काय होतं? राणीला राजकारणाचा हा ‘कागर’ मानवतो का? हे पाहण्यासाठी सिनेमा पाहणं जास्त उस्तुकाच आहे.

रिंकू राजगुरूने राणीच्या भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे निभावली आहे. सैराटमध्ये हीच रिंकू होती का असा प्रश्न आपल्याला कागर बघताना जाणवतो. प्रेम या सगळ्या टप्प्यांवरील तिचा बदलत जाणारा अभिनय लाजवाब आहे. शुभंकर तावडेने आपल्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. कार्यकर्त्याची व्यथा, संघर्ष त्याने अत्यंत उत्तमरित्या रंगवला आहे. या सिनेमाचा कणा आहे गुरूजीच्या भूमिकेतील शशांक शेंडेंचा  गुरूजीच्या कपटनीती,चाली शशांक शेंडेंनी आपल्या अभिनयाने इतक्या उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत त्याला तोड नाही. ग्रामीण राजकारणाचा बुरखा फाडणारा हा कागर एकदा पाहण्यासारखा आहे.               

Must Read

केसरी: एका शूर-वीराची गाथा सांगणारा चित्रपट

किरण परब

आनंदीबाई गोपाल यांच्या स्वप्नपूर्ती आणि वैचारिक संघर्षाची कहाणी

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More