Samachar Live
मूव्ही रीव्यूव्ह

केसरी: एका शूर-वीराची गाथा सांगणारा चित्रपट

kesari

१८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर ‘केसरी’ चित्रपट आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. एखादी ऐतिहासिक घटना पडद्यावर मांडणे सोपे नसते. पण हे आव्हान दिग्दर्शकाने पेलले आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी खुप बारकाईने केले आहे तसेच या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार व करण जोहर हे दोघेही आहेत. ह्या चित्रपटात मुख्य भूमिका अक्षय कुमार, परिणीती चोप्रा आणि मीर सरवर यांची आहे.

केसरी या चित्रपटाचा आरंभ त्या काळात स्त्रियांना कशाप्रकारे वागवले जायचे या गोष्टीपासून होते. एका स्त्रीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध करून देण्यात आलेले असते त्यामुळे तिला नवऱ्यासोबत संसार करायचा नसतो. ती त्याच्या घरातून पळून जाते. पण तिला पकडून मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी एका स्त्रीवर झालेला अन्याय हवालदार इशार सिंग (अक्षय कुमार)ला पटत नाही आणि तो तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर आक्रमण करतो आणि तिची सुटका करतो. पण ब्रिटिशांच्या सैन्यात असलेल्या इशार सिंगने केलेली ही गोष्ट ब्रिटिशांना पटत नाही आणि त्याची बदली सारागढी येथे करण्यात येते. इशार सिंग सारगडी मध्ये गेल्यानंतर काहीच दिवसांत तिथे अफगाणी फौज हल्ला करते. केवळ २१ लोक १०००० सैनिकांवर कशाप्रकारे मात करतात. त्यांची शौर्यगाथा म्हणजे केसरी.

चित्रपटाचा विषय अतिशय चांगला असला तरी मध्यंतरपर्यंत काहीच घडत नाही असे वाटते. चित्रपटात सुरुवातीची लढाई गाणं आणि पात्रांची ओळख या व्यतिरिक्त काहीच पाहायला मिळत नाही. हिंदू-मुस्लिम जातीप्रथा यांवर चित्रपटात चांगले भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील संवाद देखील चांगले जुळून आले आहेत. चित्रपटातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शेवटची लढाई. चित्रपटाचा शेवट काय असणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत असले तरी हे २१ जण कशाप्रकारे शत्रूंचा सामना करतात हे खूपच छान प्रकारे दाखवण्यात आले आहे. अनेक तास लढाई करताना त्यांना थकवा आलेला असतो. सतत बंदूक चालवून हातातून रक्त येत असते. पण तरीही ते लढत असतात हे पाहून नक्कीच अंगावर काटा येतो. चित्रपटातील एक्शन खूपच चांगली आहे. अक्षय कुमार यांनी भूमिकेला योग्य न्याय दिला आहे त्याचे करावे तितके कौतुक कमीच. परिणीतीच्या वाट्याला खूपच कमी दृश्य आली आहेत. चित्रपटात इशार सिंग व्यतिरिक्त इतर व्यक्तिरेखांना तितके महत्व देण्यात आलेले नाही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. पण तरीही ही शूरवीरांची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला हवीच.

Must Read

आनंदीबाई गोपाल यांच्या स्वप्नपूर्ती आणि वैचारिक संघर्षाची कहाणी

किरण परब

मूव्ही रीव्यूव्ह – ‘सैराट’नंतर रिंकू राजगुरूचा ‘कागर’मध्येही दमदार अभिनय

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More