Samachar Live
सामाजिक

प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा निर्धार

protest

मुंबई : वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत, आता या प्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदत वाढ दिल्याचे परिपत्रक मंगळवारी जारी केले आहे. मात्र त्यानंतरही प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार १३ मेपासून पुढील ७ दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येईल. याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांत दाखल याचिकांचा विचार करता त्यावरील अंतिम निर्णयानुसार प्रवेशाच्या वेळापत्रकात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकते, असेही प्रवेश नियामक प्राधिकरणाने मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

Must Read

मुंबईतील पादचारी पूल तुटण्याची दूसरी जीवनघाती दुर्घटना

किरण परब

खासगी नोकरी करता? मग पुढच्या महिन्यापासून वाढणार तुमचा पगार

किरण परब

पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More