Samachar Live
सामाजिक

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा राज्य सरकारच्यावतीने सत्कार

appasaheb (1)

अलिबाग : राज्य सरकारचे स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पिरांचे देऊळ (रेवदांडा) येथील त्यांच्या निवासस्थानी राज्य सरकारच्या वतीने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्या समवेत सचिनदादा, उमेशदादा धर्माधिकारी व रायगड जिल्हा भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील, महाडचे आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, उरणचे आमदार मनोहर भोईर आदींसह समाजातील विविध मान्यवरांनी आवर्जून आप्पासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले. 

Must Read

अमेरिकेतील शाळेत गोळीबार, 8 जण जखमी

किरण परब

अहवाल: चीनने अरुणाचल हा देश भारताचा भाग म्हणून दर्शविणारे ३०,००० नकाशे नष्ट केले

किरण परब

मध्य रेल्वेचा नविन निर्णय, रेल्वे फलाटांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More