Samachar Live
सामाजिक

‘विराट’ संघाला पंतप्रधान मोदींनी सांगितला जीवनाचा मूलमंत्र

Modi Tweet

नवी दिल्ली – विश्वचषक सामन्यातील उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना पत्कारावा लागला आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद होता. त्यामुळे गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, सामन्याचा निकाल आपल्यासाठी निराशाजनक राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत टीम इंडियाने लढत दिली हे पाहायला नक्कीच मजा आली, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.    

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संघाने पूर्ण विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे टिम इंडियाच्या खेळाचा आम्हाला अभिमान आहेच. जय आणि पराजय हा जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे पुढील पंतप्रधान मोदींनी कारकिर्दीसाठी टीम इंडियास मनपूर्वक शुभेच्छा असे म्हणत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. तसेच, भारतीय संघाच्या उत्कृष्ट खेळाचे समर्थन करताना पराभवानेही न खचण्याचेच सूचवले आहे.

Must Read

कामावर महिलांनी साडी किंवा सलवार-कमीजच परिधान करावी, सरकारचं नवं फर्मान

किरण परब

पेट्रोल-डिझेल दर: मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका!

किरण परब

पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More